डॅशबोर्डवर उपलब्ध खाटांची माहिती न देणार्‍या रुग्णालयांवर होणार कारवाई !

पुणे – कोरोना साथीत रुग्णांना सहजरित्या खाटांची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी डॅशबोर्ड कार्यान्वित केला आहे. यात साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत नियंत्रित केलेल्या खासगी रुग्णालयांसह जम्बो कोविड रुग्णालय आणि महापालिकेच्या रुग्णालयातील एकूण खाटांची आणि मोकळ्या खाटांची संख्या ही माहिती अपेक्षित आहे; मात्र महापालिकेच्या रुग्णालयात एकही बेड शिल्लक नाही, तसेच खासगी रुग्णालयात पण अशी स्थिती असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाइकांचे प्रचंड हाल होत आहेत. हे लक्षात घेऊन उपलब्ध खाटांची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने तातडीने अद्ययावत करणे आवश्यक आहे. माहिती न देणार्‍या रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शन काही दिवसांसाठी थांबवण्याची विनंती करणार असल्याचे तसेच त्यांच्या सुविधाही कमी करणार असल्याचे पुणे महापालिका सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. मनीषा नाईक यांनी सांगितले.