कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात् गोकुळच्या निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा देत असल्याची घोषणा २८ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत केली. या वेळी माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी.एन्. पाटील, माजी आमदार संजय घाटगे, सावकार मादनाईक, जालिंदर पाटील आदी आघाडीचे नेते उपस्थित होते.