सोलापूर येथे युवकाने आत्महत्या केल्याप्रकरणी ५ सावकारांविरुद्ध गुन्हा नोंद !

सोलापूर – येथील किशोर चव्हाण या ३० वर्षीय युवकाने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी पायल चव्हाण यांच्या तक्रारीवरून ५ सावकारांविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी पायल चव्हाण यांनी म्हटले आहे की, किशोर हे खासगी नोकरी करत होते. दळणवळण बंदीमुळे पगार वेळेत होत नसल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी काम सोडले होते. त्यामुळे घरची स्थिती बिकट झाली होती.