कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापुरात श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव साधेपणाने साजरा !


कोल्हापूर – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २७ एप्रिल या दिवशी श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. पारंपरिक वाद्यांचा गजर, मोजके मानकरी, तोफेची सलामी, तसेच श्रीपूजकांच्या उपस्थितीत मंदिर परिसरात हा उत्सव साजरा करण्यात आला. महाद्वारापासून रथ दत्त मंदिरासमोर आल्यानंतर देवीच्या उत्सव मूर्तीची पालखीतून प्रदक्षिणा काढण्यात आली. यानंतर आरतीने सोहळ्याची सांगता झाली.