अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत जागा न उरल्याने मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात येणार !

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे – शहरात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नाही. त्यामुळे मोकळ्या मैदानात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. स्मशानभूमीवरील वाढलेल्या ताणामुळे स्मशानभूमीतील लोखंडाच्या सळ्या वितळण्यास प्रारंभ झाला आहे. तेथील धूर बाहेर सोडणार्‍या चिमण्याही खराब होत असून त्या अतीगरम होत आहे. पुण्यात दिवसाला १०० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे, तर १२० हून अधिक मृत्यू हे रस्ते अपघात,  नैसर्गिक मृत्यू आणि इतर आजार यांमुळे होत असल्याची माहिती पालिकेचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंडूल यांनी दिली.