२१ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १५ दिवसांच्या दळणवळण बंदीची घोषणा करण्याची शक्यता

२० एप्रिल या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यात कडक दळणवळण बंदी लागू करण्यासाठी मंत्रीमंडळाचे एकमत झाले आहे. बैठकीला उपस्थित सर्व मंत्र्यांनी राज्यात कडक दळणवळण बंदी लागू करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !

आधुनिक वैद्य आणि परिचारिका आता पूर्णपणे थकलेले आहेत ! – डॉ. संजय ओक, प्रमुख, कोविड फोर्स

भीषण आपत्काळाचा सामना करण्यासाठी जनतेने आतातरी ईश्‍वराची भक्ती करावी. ईश्‍वरच तुम्हाला यातून तारेल !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या ऑनलाईन सत्संगांसाठी चित्रीकरणाकरता विविध उपकरणांची आवश्यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील उपकरणे अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ती खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक असतील, त्यांनी संपर्क साधावा.

बंगाल निवडणुकीचे युद्ध !

आज केवळ आणि केवळ हिंदुहिताचा पक्ष जनतेला हवा आहे. बंगालमधील हिंदूंच्या हत्या सत्रावर सत्तापालट हे उत्तर असेल, तर तो अवश्य होऊ दे; मात्र सत्तापालट होऊनही हिंदूंच्या हत्या होतच राहिल्या, तर त्यापेक्षा हिंदूंचे दुर्दैव काहीही नसेल !

पुण्यातील आरोग्य सेवांमधील अडचणींमुळे पालिकेविरोधात शिवसेनेचे आंदोलन !

अशी आंदोलने का करावी लागतात ? प्रशासन स्वतःहून यावर कृती का करत नाही ?

१० वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाविषयी तज्ञांशी चर्चा करून निर्णय घेऊ ! – शिक्षणमंत्री

१० वीच्या परीक्षा रहित करण्यात आल्या असल्या, तरी विभागाच्या माध्यमातून अभ्यास करून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करता येईल ? याविषयी केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत ? यांचा विचार केला जाईल.

समाजसाहाय्यासाठी पुढे या !

पुणे येथील संदीप काळे यांनी कोरोनाच्या संकटकाळाची आवश्यकता लक्षात घेऊन समाजसाहाय्यासाठी कौतुकास्पद पाऊल उचलले. गेल्या वर्षभरापासून ते अत्यावश्यक सेवेतील लोकांना विनामूल्य रिक्शासेवा उपलब्ध करून देत आहेत.

ऑक्सिजन वाहून नेणार्‍या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा !

राज्यात ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. यामुळे राज्यशासनाने अन्य राज्ये, तसेच महाराष्ट्रातील ऑक्सिजनची निर्मिती करणारी आस्थापने यांच्याकडे ऑक्सिजनची मागणी केली आहे. सिलेंडरद्वारे आणि द्रवरूपात हा ऑक्सिजन राज्यशासनाला उपलब्ध होणार आहे.

कल्याण येथील आधारवाडी कारागृहातील ३० बंदीवान कोरोनाबाधित !

कारागृहात सध्या १ सहस्र ९२२ बंदीवान आहेत. कोरोनाबाधितांची प्रकृती ठीक असून त्यांच्यावर ठाणे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.