सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या ऑनलाईन सत्संगांसाठी चित्रीकरणाकरता विविध उपकरणांची आवश्यकता !

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !

‘सध्या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फेसबूक’ अन् ‘यू ट्यूब’ या सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे ‘नामजप सत्संग’, ‘बालसंस्कार वर्ग’, ‘भावसत्संग’, तसेच ‘धर्मसंवाद’ या ‘ऑनलाईन सत्संग शृंखले’चे आयोजन केले जात आहे. या सत्संगांमुळे लाखो जिज्ञासूंना अध्यात्म, राष्ट्र, धर्म, भारताचा गौरवशाली इतिहास, सण आणि व्रते, धार्मिक उत्सव, बालसंस्कार, आयुर्वेद, ज्योतिष, वास्तूशास्त्र, दैनंदिन आचार-विचारांचे शास्त्र यांसह अनेक विषयांच्या संदर्भात घरबसल्या ज्ञान प्राप्त होत आहे. अखिल मानवजातीला ज्ञानामृत पाजणार्‍या या सत्संगांना जिज्ञासूंचा दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

कोणतेही आर्थिक पाठबळ नसतांना समाजहितासाठी चालू असलेल्या या ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या चित्रीकरणाची सेवा अविरतपणे चालू आहे. या सत्संगांच्या चित्रीकरणासाठी पुढील उपकरणांची आवश्यकता आहे.

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील उपकरणे अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ती खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक असतील, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘सनातन संस्था’ या नावाने काढावा.’

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्‍वस्त, सनातन संस्था. (१७.९.२०२०)