पुण्यातील आरोग्य सेवांमधील अडचणींमुळे पालिकेविरोधात शिवसेनेचे आंदोलन !

अशी आंदोलने का करावी लागतात ? प्रशासन स्वतःहून यावर कृती का करत नाही ?

पुणे – महानगरपालिकेने नागरिकांच्या जीवाचा खेळ चालवला आहे. आरोग्य सुविधा अपुर्‍या पडत आहेत. राज्यशासनाला दोष देऊन स्वतःचा नाकर्तेपणा लपवला जात आहे, असा आरोप करत पर्वती शिवसेना संघाने महापालिका कार्यालयाबाहेर आंदोलन केले. या आंदोलनात कोरोना रुग्णांना सक्षम आरोग्ययंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनामध्ये पार्वती मतदारसंघाचे विभागप्रमुख सुरज लोखंडे, उपशहरप्रमुख भरत आबा कुंभारकर, बाळासाहेब ओसवाल यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.