राज्यशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई – राज्यात ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. यामुळे राज्यशासनाने अन्य राज्ये, तसेच महाराष्ट्रातील ऑक्सिजनची निर्मिती करणारी आस्थापने यांच्याकडे ऑक्सिजनची मागणी केली आहे. सिलेंडरद्वारे आणि द्रवरूपात हा ऑक्सिजन राज्यशासनाला उपलब्ध होणार आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे अनेक कोरोनाबाधितांचे प्राण वाचणार आहेत, हे लक्षात घेऊन राज्यशासनाने ऑक्सिजनच्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा दिला आहे. याविषयीचा आदेश गृहविभागाने काढला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ऑक्सिजनची वाहतूक करणार्या गाड्यांकडून पथकर न घेण्याची सूचनाही दिली आहे.