कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्याविरुद्धचा खटला रहित !

कीर्तनात आयुर्वेद शास्त्राच्या ग्रंथातील संदर्भ देणे, हा गुन्हा ठरत नसल्याचा निर्वाळा !

गृहमंत्र्यांनी १०० कोटी रुपयांची मागणी केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करणे, हे तुमचे दायित्व ! – उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना फटकारले

कर्तव्यात न्यून पडल्याचेही उच्च न्यायालयाचे मत !

तिरुपती मंदिरात दान केल्या जाणार्‍या केसांची चीनमध्ये होणार्‍या तस्करीमागे सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेसमधील नेत्यांचा सहभाग !

आंध्रप्रदेशातील सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस हा ख्रिस्तीधार्जिणा पक्ष असल्याने अशी घटना हिंदूंच्या प्रसिद्ध मंदिराच्या संदर्भात घडत असेल, तरी केंद्र सरकारने याची चौकशी करून सत्य उघडकीस आणले पाहिजे.

‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपट : इंग्रजांना आक्रमणकर्ते दाखवण्याऐवजी पेशव्यांना दलितविरोधी दाखवण्याचा प्रयत्न !

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘समाजात तेढ निर्माण करणारा आक्षेपार्ह भाग नाही ना ?’ याविषयी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी !

इशरत जहाँ बनावट चकमकीच्या प्रकरणी ३ पोलीस अधिकार्‍यांची निर्दोष मुक्तता

ही चकमक खोटी असल्याचे सांगून आतंकवाद्यांचा बचाव करणारे आता बोलतील का ? राष्ट्रप्रेमींनी अशांना वैध मार्गाने जाब विचारायला हवा !

खाद्यपदार्थांचे प्लास्टिक पॅकेट रिसायकल करण्यास अनुमती द्या !

ग्राहकाने प्लास्टिक बाटली कचर्‍यात फेकण्याऐवजी दुकानदाराला परत दिल्यास पैसे देण्याची योजना एफ्.एस्.एस्.ए.आय.कडून बनवली जात आहे.

सातारा जिल्ह्यात खासगी शाळा शैक्षणिक शुल्क अल्प करणार !

खासगी शाळा संघाने बोलावलेल्या बैठकीत शाळा शुल्काविषयी सकारात्मक चर्चा होऊन शुल्क अल्प करण्याचा निर्णय झाल्याने ‘जिल्हा पालक संघा’च्या संघटित लढ्याला मोठे यश प्राप्त झाले आहे, अशी माहिती संघाचे प्रशांत मोदी यांनी दिली.

सांगलीत कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई

३० मार्च या दिवशी २ उपाहारगृहे आणि १ बेकरी यांच्याकडून नियमांचे उल्लंघन झाल्याच्या प्रकरणी ७५ सहस्र रुपयांचा दंड आकारण्यात आला.

पुणे येथील ग्राहकांनी वीजमीटर खुल्या बाजारातून खरेदी करू नयेत ! – महावितरणचे आवाहन

महावितरणकडून प्रतिवर्षी अनुमाने ८ ते ९ लाख नवीन वीजजोडण्या करण्यात येतात. मागील वर्षीची दळणवळण बंदी आणि कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वीजमीटरची उपलब्धता अल्प झाली होती.

लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा, डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा अन्यथा मागील वर्षीसारखी स्थिती पुन्हा अनुभवावी लागेल !

४५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांनी कोरोनाची लस घ्यावी. राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत आता वाढ होत आहे. कोरोनाचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यास हळूहळू कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या उणावू लागेल.