पुणे येथील ग्राहकांनी वीजमीटर खुल्या बाजारातून खरेदी करू नयेत ! – महावितरणचे आवाहन

पुणे, ३१ मार्च – महावितरणकडून प्रतिवर्षी अनुमाने ८ ते ९ लाख नवीन वीजजोडण्या करण्यात येतात. मागील वर्षीची दळणवळण बंदी आणि कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वीजमीटरची उपलब्धता अल्प झाली होती. त्यामुळे महावितरणने पुरवठादारांना २८ लाख ‘सिंगल फेज’, तर १.७ लाख ‘थ्री फेज’ नवीन वीजमीटर पुरवण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे आता महावितरणला प्रतिदिन अनुमाने ८ ते १० सहस्र नवीन वीजमीटरचा पुरवठा चालू झाला असल्याचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे. त्यामुळे पर्याप्त मीटर उपलब्ध करून देण्यात आल्याने ग्राहकांनी खुल्या बाजारातून वीजमीटर खरेदी करू नयेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.