दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सांगितल्याप्रमाणे प्रार्थना केल्यामुळे पित्ताचा त्रास न्यून होणे

‘मला पित्ताचा पुष्कळ त्रास होता. मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘श्री अन्नपूर्णादेवी’ आणि ‘अग्निदेवता’ यांना प्रार्थना करण्याविषयी वाचले. त्याप्रमाणे प्रार्थना करून भोजन केल्यानंतर माझा ६० टक्के पित्ताचा त्रास न्यून झाला.

भक्ती ही सर्व मार्गांपेक्षा श्रेष्ठतम असणे

स्वानुभवानेच अनुभवता येणार्‍या भक्तीविषयी शब्दांच्या अवडंबराने कंठशोष करण्यापेक्षा तिचा अनुभव घेऊन पहा, ती समजून घ्या, तिच्यापासून चांगली फळे प्राप्त करून घ्या.