गृहमंत्र्यांच्या त्यागपत्रासाठी मुंबईत आंदोलन करणारे भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांना अटक
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या त्यागपत्रासाठी दादर रेल्वेस्थानकाच्या बाहेर आंदोलन करणार्या भाजपच्या नेत्यांना पोलिसांनी अटक केली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या त्यागपत्रासाठी दादर रेल्वेस्थानकाच्या बाहेर आंदोलन करणार्या भाजपच्या नेत्यांना पोलिसांनी अटक केली.
महापालिका, पोलीस, उत्पादन शुल्क यांसह विविध शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून १९ मार्चपासून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.
देशभरातील वेगवेगळ्या अधिकोषातील काही खात्यांची गोपनीय माहिती मिळवणे आणि त्यांची विक्री करून त्याद्वारे कोट्यावधी रुपये कमवणे असा कट नुकताच पुणे सायबर पोलिसांनी उघडकीला आणला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गत ४ दिवसांपासून पाचगणी शहरातील एका भागात पाणीपुरवठा न झाल्यामुळे नागरिकांनी प्राधिकरण कार्यालय गाठले; मात्र समस्येवर उपाय न काढता वरिष्ठ अभियंता आणि शाखाधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. याचे रूपांतर पुढे हाणामारीमध्ये झाले.
जयसिंगपूर येथील एका रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू ठेवल्याचे भासवून कुणीतरी खोडसाळपणा केला आहे. कोल्हापूर बॉम्बशोधक पथकाने याविषयी सखोल पहाणी केल्यावर यात ठेवलेल्या वस्तूंमध्ये प्लास्टिकचे छोटे पाईप गुंडाळून ठेवलेले आढळले. यात कोणतीही स्फोटके मिळालेली नाहीत.
अहमदपूर तालुक्यातील कोपरा किनगाव येथे पीडित मुलीच्या घरासमोरील जागेत असलेले देवीचे मंदिर आणि मूर्ती पाडण्यास विरोध करणार्या पीडित मुलीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांसह १६ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातील मुरवास गावामध्ये धर्मांध वन माफियांनी त्यांच्या विरोधात आवाज उठवणारे संतराम वाल्मीकि यांची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या केली. धर्मांध वन माफिया भ्रष्ट वनाधिकार्यांच्या साहाय्याने येथील सरकारी भूमीवर अतिक्रमण करत होते.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने kolhapur.gov.in या नावाने अधिकृत संकेतस्थळ चालवण्यात येते. या संकेतस्थळावर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची चुकीची माहिती देण्यात आली आहे.
आपत्कालीन वाहनांना ये-जा करण्यासाठी डेहरादून ते हरिद्वारपर्यंत विशेष मार्गिका (ग्रीन कॉरिडोर) उपलब्ध करून देण्यात येणार आहे
कोरोनामुळे कुंभमेळा कसा होणार ? याविषयी गैरसमज पसरवण्यात आले.