१० मंगल कार्यालयांवर धडक कारवाई करत ७ सहस्र रुपये दंड वसूल

कोरोनाच्या दुसर्‍या साथीचा धोका रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रात आरोग्य सर्वेक्षण आणि ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर देण्याच्या सूचना महापालिका आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

‘अँटीलिया’जवळ स्फोटके ठेवल्याच्या वृत्ताचे ‘जैश-उल-हिंद’कडून खंडण

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटीलिया निवास्थानाबाहेर गाडीत स्फोटके ठेवल्याच्या वृत्ताचे आतंकवादी संघटना ‘जैश-उल-हिंद’ने खंडण केले आहे. या संघटनेने प्रसारित केलेल्या पोस्टरमध्ये म्हटले आहे की, आम्ही अंबानी यांना कधीच धमकी दिली नाही.

अंगारकी चतुर्थीला पुणे येथील मोरया गोसावी गणपति मंदिर दर्शनास बंद रहाणार !

कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा आणि अंगारकी चतुर्थीला होणारी संभाव्य गर्दी यांमुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उपाय म्हणून तीर्थक्षेत्र चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिर भाविकांना दर्शनासाठी २ मार्च या दिवशी बंद रहाणार आहे.

मंदिराच्या फरशीवर डमरू आणि त्रिशूळ यांची चित्रे रंगवल्याने ती अनेक भक्तांच्या पायदळी तुडवली जाणे

‘मी काही दिवसांपासून प्रतिदिन एका मंदिरात दर्शनासाठी जाते. एके दिवशी मी मंदिरात गेल्यावर सहज माझे लक्ष फरशीकडे गेले. तेव्हा लाल रंगाच्या मोठ्या चौकोनाच्या बाजूने लहान आकारात चित्र असल्याचे मला दिसले

शफेपूर (संभाजीनगर) येथील शेतकर्‍याची आत्महत्या !

शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी शासकीय उपाययोजनांसाह त्यांचे मनोबल वाढवणे आवश्यक आहे. मनोबल केवळ साधना केल्यानेच वाढणार आहे. यासाठी धर्मशिक्षण घेणे अपरिहार्य आहे हे दर्शवणारी ही घटना !

वरळी येथील गर्दी जमवल्याच्या प्रकरणी पबवर गुन्हा नोंद

एका पबमध्ये कोरोनाशी संबंधित नियमांचे उल्लंघन करत पुष्कळ गर्दी जमवल्याप्रकरणी पबवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तसेच पबचा परवाना तात्पुरत्या स्वरूपात रहित करण्यात आला आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधासाठी काँग्रेसच्या वतीने सायकलीवरून आंदोलन 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अल्प असतांना देशात मात्र इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकारने लादलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर वाढल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने या वेळी करण्यात आला. 

पुण्यात लसीकरणासाठी मोठी गर्दी; कमला नेहरू रुग्णालयात गर्दीमुळे गोंधळ !

लसीकरणाचे नियोजन भोंगळपणे करणे, हे प्रशासनाला लज्जास्पद! ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी त्रास सोसावा लागणे, हे शासनाला लज्जास्पद आहे !

सैन्य भरतीसाठी घेण्यात येणार्‍या लेखी परीक्षेचा पेपर फुटला !

सैन्य भरतीसाठी घेण्यात येणार्‍या लेखी परीक्षेची प्रश्‍नपत्रिका फोडून तरुणांची आर्थिक फसवणूक करणार्‍या दोघांना सैन्याच्या गुप्तचर विभागाच्या साहाय्याने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने कह्यात घेतले आहे.

खासदार उदयनराजे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई येथील ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली.