‘अँटीलिया’जवळ स्फोटके ठेवल्याच्या वृत्ताचे ‘जैश-उल-हिंद’कडून खंडण

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटीलिया निवास्थानाबाहेर गाडीत स्फोटके ठेवल्याच्या वृत्ताचे आतंकवादी संघटना ‘जैश-उल-हिंद’ने खंडण केले आहे. या संघटनेने प्रसारित केलेल्या पोस्टरमध्ये म्हटले आहे की, आम्ही अंबानी यांना कधीच धमकी दिली नाही. आमच्याकडून त्यांच्या कुटुंबाला कुठलाच धोका नाही. प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होणारे पत्र खोटे आहे.  पोस्टरमध्ये दावा करण्यात आला आहे की, आमची लढाई भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विरोधात आहे.