वरळी (मुंबई) – येथील एका पबमध्ये कोरोनाशी संबंधित नियमांचे उल्लंघन करत पुष्कळ गर्दी जमवल्याप्रकरणी पबवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तसेच पबचा परवाना तात्पुरत्या स्वरूपात रहित करण्यात आला आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील ‘नाईट लाईफ’ला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने दुजोरा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी त्यांच्यावर टीका केली.
‘शिवजयंती साजरी करण्यास अनुमती न देणारे सरकार पबमधील गर्दीविषयी कारवाई का करत नाही ?’, असा त्यांचा प्रश्न होता. ‘या प्रकरणी कारवाई होईल’, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते.