पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधासाठी काँग्रेसच्या वतीने सायकलीवरून आंदोलन 

मुंबई – पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरून काँग्रेस पक्षाच्या वतीने १ मार्च या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सर्व मंत्री आणि आमदार यांनी सायकलवरून विधानभवन येथे येऊन पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवला. या वेळी काँग्रेसच्या नेत्यांनी विधानभवनात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अल्प असतांना देशात मात्र इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकारने लादलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर वाढल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने या वेळी करण्यात आला.