फातोर्डा पोलिसांनी दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा २४ घंट्यांच्या आत लावला छडा

पोलिसांनी या प्रकरणी दादर, मुंबई येथील शिवाजी पार्क येथून रवीनकुमार सडा (वय १८ वर्षे, रहाणारा बिहार), आदित्यकुमार खरवाल (वय १८ वर्षे, रहाणारा झारखंड) आणि आकाश घोष (वय २० वर्षे, रहाणारा झारखंड) यांना कह्यात घेतले आहे.

शिवसेना आगामी गोवा विधानसभेची निवडणूक २५ ते ३० जागांवर लढवणार ! – शिवसेनेचे खासदार संजय राऊत

गोव्यात आगामी विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना २५ ते ३० जागांवर निवडणूक लढवणार आहे. राज्यात शिवसेनेचा प्रभाव असलेल्या ठिकाणी निवडणूक लढवली जाणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नुकतीच येथे एका पत्रकार परिषदेत दिली.

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या ६ मासांत २३७ गुन्हेगारांना अटक

गुन्हेगारांवर कडक कारवाई करणे हेच पोलिसांचे कर्तव्य आहे. त्याचा विसर पोलिसांना अन्य वेळी पडलेला असतो का, असा प्रश्‍न सामान्यांच्या मनात आल्यास चूक ते काय ?

निवृत्त न्यायाधीश उत्कर्ष बाकरे यांचा ‘गोवा लोकायुक्त’ पद स्वीकारण्यास नकार

निवृत्त न्यायाधीश उत्कर्ष बाकरे यांनी ‘गोवा लोकायुक्त’ पद स्वीकारण्यास नकार दर्शवला आहे. निवृत्त न्यायाधीश उत्कर्ष बाकरे यांनी वैयक्तिक कारणास्तव शासनाला यापूर्वी दिलेले संमतीपत्र मागे घेतले आहे.

मनसुख हिरेन यांच्या २ भ्रमणभाषची वेगवेगळी ठिकाणे सापडली

मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आतंकवादविरोधी पथकाच्या अन्वेषणातून वर्तवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

पिंगुळी येथे प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचा वाढदिवस आणि श्री गौरीशंकर मंदिराचा वर्धापनदिन यानिमित्त विविध कार्यक्रम

श्री गौरीशंकर मंदिराचा २६ वा वर्धापनदिन आणि महाशिवरात्री यांचे औचित्य साधून येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात ‘शिवशक्ती यागा’चे आयोजन करण्यात आले आहे.

अनैतिक ‘अ‍ॅप’ !

जे जे समाज, संस्कृती पर्यायाने राष्ट्रासाठी घातक आहे, त्याविषयी कडक निर्बंध घालणे, यातच खरे राष्ट्रहित आहे. त्यामुळे केंद्र सरकार अशा प्रकारच्या ‘अ‍ॅप’वर बंदी घालण्यासाठी पावले उचलेल, अशी आशा आहे !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘लव्ह जिहाद’ याविषयी ‘ऑनलाईन’ व्याख्यान !

६ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्रजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे श्री. पराग गोखले यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

‘ऑनलाईन कार्यक्रम सेवेतील उपकरणे म्हणजे ‘सहसाधक’ आहेत’, असा भाव ठेवून त्यांच्यावर आध्यात्मिक उपाय करून अडथळ्यांवर मात करा !

या ऑनलाईन उपक्रमांच्या सेवेतील सहसाधकांच्या माध्यमातून समष्टी सेवा होणार आहे, या कृतज्ञताभावाने जोडावी. त्यांच्यासाठी भावपूर्ण प्रार्थना आणि त्यांची शुद्धी करावी.

‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीच्या फेसबूक पेजवरून हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित

जागतिक महिलादिनानिमित्त ‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीने ८ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित केली.