पणजी, ९ मार्च (वार्ता.) – निवृत्त न्यायाधीश उत्कर्ष बाकरे यांनी ‘गोवा लोकायुक्त’ पद स्वीकारण्यास नकार दर्शवला आहे. निवृत्त न्यायाधीश उत्कर्ष बाकरे यांनी वैयक्तिक कारणास्तव शासनाला यापूर्वी दिलेले संमतीपत्र मागे घेतले आहे.
शासनाने आधी नवीन लोकायुक्तांना पूर्वीप्रमाणे सर्व अधिकार बहाल करावेत ! – दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते
शासनाने नवीन लोकायुक्त नियुक्तीला संमती देण्याविषयीचा प्रस्ताव विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना पाठवला होता. याविषयी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत शासनावर टीका करतांना म्हणाले, ‘‘शासनाने विरोधी पक्षांचा विरोध असूनही ‘लोकायुक्त दुरुस्ती विधेयक’ नुकतेच संमत केले आहे. याद्वारे ‘गोवा लोकायुक्ता’चे अधिकार उणे करण्यात आले आहेत. शासनाने मला पाठवलेल्या प्रस्तावावर विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. शासनाकडे मी मागणी करतो की, त्यांनी प्रथम अनधिकृत कृतींवर कारवाई करण्यासाठी नवीन लोकायुक्तांना सर्व अधिकार पूर्वीप्रमाणेच बहाल करावेत.’’