
पणजी, ९ मार्च (वार्ता.) – गोव्यात आगामी विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना २५ ते ३० जागांवर निवडणूक लढवणार आहे. राज्यात शिवसेनेचा प्रभाव असलेल्या ठिकाणी निवडणूक लढवली जाणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नुकतीच येथे एका पत्रकार परिषदेत दिली.
संजय राऊत पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात भाजप शासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष आहे, तसेच विरोधी पक्ष त्यांचे काम व्यवस्थित करत नाहीत. यामुळे केवळ निवडणुकीच्या वेळी काम करणार्या ‘आप’सारख्या पक्षाला गोव्यात प्रवेश करण्यास संधी मिळत आहे. गत निवडणुकीत शिवसेनेने समविचारी पक्षांसमवेत युती करून एकूण ३ जागांवर निवडणूक लढवली होती.’’
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
गोव्यातील अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीत ३६ टक्क्यांनी वाढ ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?