कोरोनामुळे यापुढे जिल्ह्यात एकही मृत्यू होणार नाही यांसाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील ! – जिल्हाधिकारी, कोल्हापूर

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात १ मार्चपासून तिसर्‍या टप्प्यातील लसीकरणास प्रारंभ झाला आहे. या टप्प्यात ६० वर्षांवरील आणि ४५ ते ५९ वर्षे या वयोगटातील व्याधीग्रस्त असलेले लाभार्थी यांची अ‍ॅपद्वारे नोंदणी करून लसीकरण करण्यात येणार आहे.

विवाह संस्थेवरील संकट !

पुणे शहरातील सोळाव्या वयापूर्वीच्या सरासरी ७५ टक्क्यांहून अधिक मुले-मुली एका तरी ‘रिलेशनशिप’मध्ये गुंतल्याचे ‘प्रयास’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले.

मंदिर सरकारीकरणाचा निर्णय प्रशासनाने त्वरित मागे घ्यावा ! – गुरुप्रसाद गौडा, कर्नाटक राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

एकीकडे शासन ‘सेक्युलर’ आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण करायचे, असे करत आहे. या निर्णयास सर्व देवस्थान समित्यांचे विश्‍वस्त, भाविक, हिंदुत्वनिष्ठ यांचा तीव्र विरोध असून हा निर्णय त्वरित मागे घ्यावा.

लंडनजवळ दुसर्‍या महायुद्धातील ९०० किलोचा बॉम्ब सापडला !

लंडनच्या जवळील एक्सेटर शहरामध्ये दुसर्‍या महायुद्धातील ९०० किलोचा जिवंत बॉम्ब सापडल्यानंतर त्याला निकामी करण्यासाठी येथील संपूर्ण परिसर रिकामी  करण्यात आला.

भाजप आमदारांकडून आर्णी नगरपालिकेत अपहार करणार्‍या बांधकाम अभियंत्याला निलंबित करण्यासाठी गोंधळ !

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी नगरपालिकेतील बांधकाम अभियंता आणि कंत्राटदार यांनी संगनमत करून मान्सूनपूर्व कामात लाखो रुपयांचा अपहार केला असल्याने बांधकाम अभियंता नीलेश राठोड यांना निलंबित करण्यात यावे, अशी आग्रहाची मागणी आर्णी येथील आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी विधानसभेत २ मार्च या दिवशी प्रश्‍नोत्तरात केली.

मथुरा येथील कथावाचक सुमेधा नंदजी महाराज यांना हिंदी भाषेतील सनातन पंचांग भेट

राधा नगरातील श्री राधेश्‍वर महादेव मंदिराच्या वार्षिक महोत्सवाच्या वेळी संत समागमास उपस्थित राहिलेले वृंदावन येथील कथावाचक श्री सुमेधा नंदजी महाराज यांची सनातनचे साधक श्री. राजीव भाटिया आणि साधिका विमल धमीजा यांनी भेट घेतली.

कोडोली (तालुका पन्हाळा) परिसरात चोरून होणारी गोहत्या थांबवा !

विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे पोलीस ठाण्यात निवेदन

ओडिशा येथील धर्मप्रेमींनी हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभे’च्या प्रसारामध्ये घेतलेला उत्स्फूर्त सहभाग

२१ फेब्रुवारी या दिवशी हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ पार पडली. या सभेच्या प्रसारासाठी ओडिशा येथील धर्मप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

राज्यातील ९० टक्के वाळू उत्खनन अवैध, जिल्हाधिकार्‍यांपासून मंत्रालयापर्यंत हप्ते चालू ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

गेली अनेक वर्षे अवैध वाळूउपसा होत आहे. यात अनेक वेळा तहसीलदार, माहिती अधिकार कार्यकर्ते आदींवर प्राणघातक आक्रमणे झाली आहेत. अवैध वाळूउपसा चालू रहाण्यामागे भ्रष्टाचार हेच मोठे कारण आहे, हे सामान्य जनतेलाही माहीत आहे.

कामकाज अधिक असले, तरी मंत्र्यांनी लक्षवेधीला उपस्थित रहावे ! – सभापती, विधान परिषद

जनतेचे प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वसन देेणार्‍या लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्षात त्यासाठी वेळ देणे अपेक्षित आहे !