मथुरा येथील कथावाचक सुमेधा नंदजी महाराज यांना हिंदी भाषेतील सनातन पंचांग भेट

सनातन पंचांग पहातांना डावीकडे श्री सुमेधा नंदजी महाराज आणि श्री. राजीव भाटिया

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील राधा नगरातील श्री राधेश्‍वर महादेव मंदिराच्या वार्षिक महोत्सवाच्या वेळी संत समागम आयोजित करण्यात आला होता. या संत समागमला उपस्थित राहिलेले वृंदावन येथील कथावाचक श्री सुमेधा नंदजी महाराज यांची सनातनचे साधक श्री. राजीव भाटिया आणि साधिका विमल धमीजा यांनी भेट घेतली. या प्रसंगी साधकांनी श्री सुमेधा नंदजी महाराज यांना सनातन संस्थेविषयी माहिती देऊन त्यांना हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग’ भेट देत कार्यासाठी आशीर्वाद घेतले.