कामकाज अधिक असले, तरी मंत्र्यांनी लक्षवेधीला उपस्थित रहावे ! – सभापती, विधान परिषद

मुंबई, २ मार्च (वार्ता.) – लक्षवेधींसाठी बैठक घेण्यासाठी निर्देश देऊन शासनाच्या कामकाजात मी हस्तक्षेप करणार नाही; पण ज्या लक्षवेधी स्वीकृत होतील, त्यांवर शासनाने बैठक घ्यायला हवी. कामकाज अधिक असले, तरी मंत्र्यांनी लक्षवेधीला उपस्थित रहायला हवे, असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. २ मार्च या दिवशी विधान परिषदेच्या कामकाजाला प्रारंभ झाल्यावर विरोधी पक्षाकडून अधिवेशनात लक्षवेधींवर चर्चा करण्याची मागणी केली. यावर सभापती निंबाळकर यांनी वरील वक्तव्य केले. (जनतेचे प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वसन देेणार्‍या लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्षात त्यासाठी वेळ देणे अपेक्षित आहे ! – संपादक)