धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांच्या विरोधाचा परिणाम !
मुंबई – ‘गूगल’ या ‘सर्चइंजिन’च्या ‘गूगल ट्रान्सलेटर’ या संकेतस्थळावर इंग्रजीमधील ‘गॉड ब्लेस यू’ या वाक्याचे हिंदीमध्ये भाषांतर करतांना ‘अस्सलाम अलैकुम’ असे उर्दूमध्ये भाषांतर दाखवण्यात येत होते. याचा प्रसार धर्मांधांकडून होत असल्याचे लक्षात आल्यावर धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांनी सामाजिक माध्यमांतून गूगलकडे याविषयी तक्रार केली. यानंतर गूगलकडून त्यात पालट करून आता याचे ‘भगवान आपका भला करे’ असे योग्य भाषांतर होत असल्याचे दिसत आहे.