१ मार्चपासून सप्ताहातील पाच दिवस सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस धावणार !

सोलापूर – अकरा मासांच्या प्रतीक्षेनंतर मध्य रेल्वे सोलापूर विभागातील सोलापूर-पुणे-सोलापूर ही हुतात्मा एक्सप्रेस १ मार्चपासून धावणार असल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली. हुतात्मा एक्सप्रेस चालू करण्याची मागणी रेल्वे संघटना आणि लोकप्रतिनिधी यांनी केली होती. त्याचा विचार करून रेल्वे प्रशासनाने ही गाडी चालू केली आहे.

सोलापूर-पुणे-सोलापूर ही हुतात्मा एक्सप्रेस पुढील आदेश येईपर्यंत सोलापूर स्थानकावरून शनिवार आणि रविवार सोडून सप्ताहातील ५ दिवस धावणार आहे. कोरोनाविषयी राज्य आणि केंद्र शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन रेल्वे गाडीमध्ये, तसेच रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी करावे अन्यथा रेल्वे प्रशासनाकडून संबंधित प्रवाशांना दंड आकारण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.