अनंतनागमध्ये ४ आतंकवादी ठार

३-४ आतंकवादी ठार केल्याने काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही, तो नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक !

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) – येथील सिरहामा भागात सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार झाले. आणखी २-३ आतंकवादी लपले असल्याच्या शक्यतेने सायंकाळी उशिरापर्यंत येथे गोळीबार चालू होता. येथे आतंकवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलाने येथे घेराव घालत शोधमोहीम चालू केली होती.