बंगालमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सभेनंतर तृणमूल काँग्रेसने गंगाजल शिंपडून केली मैदानाची ‘शुद्धी’ !

यातून तृणमूल काँग्रेसवाल्यांची विकृत मानसिकता स्पष्ट होते ! स्वतःला पुरो(अधो)गामी म्हणवून घेणारा पक्ष म्हणे लोकशाहीचे रक्षण करणार ! अशा घटनांविषयी अंनिसारख्या संघटना मात्र मौन बाळगतात !

हुगली (बंगाल) – येथील मैदानात २२ फेब्रुवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मैदानात जाऊन गंगाजल शिंपडून त्याचे ‘शुद्धीकरण’ केले. तृणमूल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप यादव यांच्या नेतृत्वाखाली हे शुद्धीकरण करण्यात आले. या मैदानात २४ फेब्रुवारी या दिवशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सभा होणार होती.

याविषयी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणाले की, भाजपवाल्यांचे पाय या मैदानाला लागल्याने ते अपवित्र झाले आहे. भाजप ही एक अशुभ शक्ती आहे. यामुळे तिचा त्रास दूर होऊन बंगालला मुक्ती मिळण्यासाठी गंगाजल शिंपडण्यात आले.