समर्थभक्त माधवराव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन  

मिरज, २६ फेब्रुवारी (वार्ता.) –  समर्थभक्त श्री. माधवराव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने कै. प्रभाकर पटवर्धन आणि कै. श्रीमती शीलाताई प्रभाकर पटवर्धन यांचे पुण्यस्मरण, तसेच महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात १० मार्च या दिवशी पहाटे ५ ते सायंकाळी ६ पर्यंत अखंड रामनामजप, सकाळी ८ वाजता शिवपंचायतन यज्ञ होईल. ११ मार्च या दिवशी पहाटे ५ वाजता लघुरुद्र, सकाळी १० वाजता विष्णुसहस्रनाम आणि त्यानंतर महाआरोग्य शिबिर होईल. १० आणि ११ मार्च या दोन्ही दिवशी सायंकाळी ७ वाजता सौ. सुचेता हसबनीस यांची कीर्तन सेवा होणार आहे. हे सर्व कार्यक्रम काशी विश्‍वेश्‍वर देवालय, भानू तालीमशेजारी, जिलेबी चौक येथे होतील. तरी अधिकाधिक भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री काशीविश्‍वेश्‍वर देवालयाचे अध्यक्ष श्री. किशोर पटवर्धन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

महाशिवरात्र कीर्तन महोत्सव समिती, माधवराव गाडगीळ मित्र परिवार, तसेच दासबोध अभ्यास मंडळ यांच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने १० मार्च या दिवशी पहाटे ५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अखंड १३ घंटे ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या नामजपाचे आयोजन करण्यात आले आहे. हा नामजप काशी विश्‍वेश्‍वर मंदिराच्या पटांगणात होईल. संयोजन आणि अन्य व्यवस्था यांच्या दृष्टीने नावनोंदणी आवश्यक आहे. तरी भाविकांनी श्री. माधवराव गाडगीळ (संपर्क क्रमांक – ९६०४२९४२४५), गाडगीळवाडा, ब्राह्मणपुरी आणि श्री. प्रकाश जोशी, अक्षय अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली येथे नावनोंदणी करावी. परगावच्या भक्तांची भोजन-निवास यांची सोय पूर्वसूचना दिल्यास करण्यात येईल. कोरोनामुळे सर्वांनी शासनाचे नियम पाळून (मास्क लावणे, अंतर ठेवून बसणे आदी) स्वयंसेवकांना सहकार्य करावे, असे आवाहन महाशिवरात्र कीर्तन महोत्सव समितीचे संयोजक श्री. माधवराव गाडगीळ यांनी केले आहे.