तुमकुरू (कर्नाटक) येथील श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्मादेवीचे मंगळुरू येथील आश्रमात शुभागमन

देवीने सोबत आलेल्या भक्तांच्या माध्यमातून ‘सनातनचे कार्य उत्तरोत्तर वाढू दे’, असा आशीर्वाद दिला, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याची प्रशंसा केली. भक्तांनी सांगितले की, सनातनचे कार्य अद्भुत आहे. आम्हीही तुमच्या कार्याला हातभर लावू.

सस्नेह निमंत्रण !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा ‘ऑनलाईन’ २१ वा वर्धापनदिन सोहळा !

केंद्रशासनाचा ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट २०१०’ महाराष्ट्रात तातडीने लागू करावा !

वैद्यकीय क्षेत्रातील अनागोंदी कारभार थांबवण्यासाठी केंद्रशासनाचा ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट २०१०’ तातडीने लागू करावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना देण्यात आले.

सावंतवाडीत प्राणघातक आक्रमण झालेल्या टेम्पोचालकाचे निधन

जिमखाना मैदानानजिक लुटण्याच्या उद्देशाने टेम्पोचालक अजयकुमार श्रीपतराव पाटील (हाडोळी, कोल्हापूर) त्यांच्यावर दोघांनी चाकूने प्राणघातक आक्रमण केले होते. यामध्ये ते गंभीर घायाळ झाल्याने रुग्णालयात उपचार चालू असतांना निधन झाले.

कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

कांजूरमार्ग ‘मेट्रो-३’ च्या कारशेडचे काम त्वरित थांबवा, परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

गोमांसाचा तुटवडा दूर करण्यासाठी गोवा शासन प्रयत्न करेल ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

कर्नाटकच्या विधानसभेने ‘कर्नाटक पशूधन हत्या प्रतिबंध आणि संवर्धन’ हे गोहत्याबंदी विधेयक नुकतेच संमत केले आहे. यामुळे गोव्यात गोमांसाचा गेले काही दिवस तुटवडा भासू लागला आहे.

सिंधुदुर्गात कोरोना लसीकरणासाठीचे प्रशासनाचे नियोजन पूर्ण

बहुप्रतिक्षित कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाविषयी जिल्हा प्रशासनाने नियोजन पूर्ण केले आहे. त्या अनुषंगाने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे.

(म्हणे) ‘जवाहरलाल नेहरूंमुळे गोव्याला स्वातंत्र्य विलंबाने मिळाल्याच्या अपप्रचाराला बळी पडू नये !’ – दक्षिणायन अभियान

जे सत्य आहे, ते कसे लपून रहाणार ? नेहरूंच्या गांधीवादी भूमिकेमुळेच भारताच्या स्वातंत्र्यानंतर १४ वर्षे गोमंतकीय स्वातंत्र्यापासून वंचित राहिले.

सांगवे सोसायटीची रास्त भाव धान्य दुकानाची अनुज्ञप्ती रहित

तालुक्यातील सांगवे सोसायटीच्या रास्त भाव धान्य दुकानाची अनुज्ञप्ती जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी रहित केली आहे. याविषयी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती, अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत यांनी दिली.

नंदुरबार येथे ‘हिंदु सेवा साहाय्य समिती’च्या वतीने आमरण उपोषणास प्रारंभ !

मृत्यूमुखी पडलेली निष्पाप बालिका हिताक्षी माळी हिच्या मृत्यूला उत्तरदायी असलेल्या नंदुरबार नगरपरिषदेच्या ठेकेदाराचा ठेका रहित करण्याबरोबर अन्य मागण्याही उपोषणार्थींच्याकडून करण्यात आल्या आहेत.