
सांगली – केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी सुधारणा विधेयक २०२० या कायद्यात शेतकर्यांच्या प्रगतीसाठी आणि आर्थिकदृष्ट्या उन्नतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. याची माहिती सोप्या शब्दात शेतकर्यांपर्यंत पोचवण्याच्या उद्देशाने भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी ‘कृषी सुधारणा विधेयक २०२०’ पुस्तिका काढली आहे. त्याचे प्रकाशन मुंबई येथे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार श्री. सुधीर गाडगीळ, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. विक्रांत पाटील, सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. धीरज सूर्यवंशी, सचिव श्री. विश्वजित पाटील, श्री. कृष्णा राठोड आदी उपस्थित होते.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला