मुंबईसह नवी मुंबई, ठाणे येथे ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद, तर कोकणात प्रतिसाद नाही

केंद्रसरकारने कृषी कायद्यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी घोषित केलेल्या ‘बंद’ला मुंबईसह नवी मुंबई, ठाणे येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने बंदला पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचे कार्यकर्ते ‘बंद’मध्ये सहभागी झाले होते.

हिंदूंवर धर्माचे संस्कार करण्याचे दायित्व धर्मगुरुंचे !

हिंदूंवर धर्माचे संस्कार करण्याचे दायित्व ‘धर्मगुरु’ आणि ‘रामानंदाचार्य’ यांचे असते. ते कधीही त्यांचा मठ अन् आश्रम सोडून जनतेत मिसळले नाहीत. त्यामुळे हिंदूंना ‘धर्म म्हणजे काय आणि त्याची आवश्यकता काय ?’, याविषयी ज्ञानच मिळाले नाही.

आतंकवादविरोधी ‘मॉक ड्रिल’मध्ये ‘ग्रेनेड’च्या स्फोटात हवालदार घायाळ

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन ‘सुपर स्पेशालिटी’ विभागाजवळ ८ डिसेंबर या दिवशी सकाळी ‘ग्रेनेड’ स्फोटाचा ‘मॉक ड्रिल’ (रंगीत तालिम) करतांना गोवा पोलिसांच्या आतंकवादविरोधी पथकातील पोलीस हवालदार जयदेव सावंत घायाळ झाला.

उसगाव येथील शिक्षिका कोरोनाबाधित

ज्येष्ठ शिक्षिका कोरोनाबाधित झाल्याने उसगाव, फोंडा येथील विद्यालयाचे इयत्ता १० वी आणि १२ वीचे वर्ग एक आठवड्यासाठी रहित करण्यात आले आहेत.

आंबोली येथे ११ डिसेंबरला ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ साजरा होणार

११ डिसेंबर या ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिना’च्या दिवशी सकाळी १० वाजता सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील महादेवगड पॉईंट येथे ‘माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट’ संस्थेने एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या वेळी पर्वतपूजन आणि मार्गदर्शन असे कार्यक्रम होणार आहेत.

ग्रहदोषांमुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सुसह्य होण्यासाठी ‘साधना करणे’ हा सर्वोत्तम उपाय !

ग्रहदोषांमुळे होणार्‍या दुष्परिणामांच्या निवारणासाठी ज्योतिषशास्त्रात जप, दान, शांती, रत्न धारण करणे इत्यादी उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्याने दुष्परिणामांची तीव्रता काही प्रमाणात न्यून होण्यास साहाय्य होते; परंतु हे उपाय तत्कालीक परिणाम करतात.

डॉ. आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वहाण्यास गेलेले हिंदु मक्कल कत्छीचे अर्जुन संपथ यांच्याशी द्रमुक आणि व्ही.सी.के. यांच्या कार्यकर्त्यांकडून गैरवर्तन

समानतेसाठी लढा देणार्‍या बाबासाहेबांच्या नावाखाली अशा प्रकारचे गैरव्यवहार करणारे राजकीय पक्ष कधीतरी समाजाचा व्यापक विचार करू शकतील का ?

अशा देशांवर कठोर कारवाई हवी !

अमेरिकेने धार्मिक स्वातंत्र्याची गळपेची करणार्‍या १० देशांची सूची बनवली आहे. यांत चीन, पाकिस्तान, इराण, सौदी अरेबिया आदींचा समावेश आहे. ‘या देशांच्या  विरोधात कारवाई करण्याची सिद्धता करत आहोत’, अशी चेतावणीही अमेरिकेने दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाला ‘आदर्श पत्रकार संघ’ पुरस्कार घोषित

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर याचे स्मारक व्हावे, यासाठी सतत २५ वर्षे पाठपुरावा करून स्मारकाचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार्‍या सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाला यावर्षीचा मानाचा समजला जाणारा ‘रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.