७० वर्षांतील विविध घोटाळ्यांत जनतेच्या लुटलेल्या ४ लाख ८२ सहस्र कोटी रुपयांचा हिशेब काँग्रेसच्या नेत्यांनी द्यावा ! – हिंदु जनजागृती समिती

श्रीरामाला काल्पनिक घोषित करणार्‍या काँग्रेसचा डोळा हिंदु मंदिरांतील सोन्यावर ! हिंदूंच्या मंदिरांतील सोने घेण्याचे कपटी आवाहन काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

कोरोनामुळे आता अधिवक्त्यांना काळा कोट घालणे बंधनकारक नाही ! – सर्वोच्च न्यायालयाचा काही कालावधीसाठी निर्णय

मुळात काळा कोट, झगा आणि टाय वापरणे ही इंग्रजांची गुलामगिरी आहे. ती भारतात आतापर्यंत टाकून देणे अपेक्षित होते, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

‘कोव्हिड १९ अँटिबॉडी’ शोधणारे पहिले स्वदेशी किट सिद्ध

येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने कोव्हिड १९ अँटिबॉडीचा शोध घेणारे पहिले स्वदेशी किट सिद्ध केले आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये भारताने मिळवलेले हे यशच म्हणावे लागेल. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी १० मे या दिवशी माहिती दिली.

आंध्रप्रदेशातील तिरुपती, श्रीकालहस्ती आणि कनिपक्कम् या ३ मोठ्या मंदिरांच्या मालकीच्या इमारतींचा कोरोनाग्रस्तांवरील उपचारांसाठी वापर !

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यावर हिंदूंच्या मंदिराच्या इमारती प्रशासनाला वापरण्यास दिल्या जात आहेत; मात्र अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांकडून अशा प्रकारे इमारती देण्यात आल्याचे वृत्त ऐकिवात येत नाही, असे का ?

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून पोलीस आणि वैद्यकीय पथक यांच्यावर आक्रमण

पोलीस आणखी किती दिवस धर्मांधांकडून असे मार खात रहाणार आहेत ? देशात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या असतांना त्यातून काहीही न शिकणार्‍या पोलिसांना धर्मांधांकडून मार खाणे आवडते, असे समजायचे का ?

 देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ सहस्र ९७२, मृतांची संख्या ७५

देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या २४ घंट्यांत १२ जणांचा मृत्यू. ही संख्या एका दिवसातील सर्वाधिक आहे,

‘अल्कोहल विथड्रॉवल सिंड्रोम’ पीडितांना मद्य विकण्यावर केरळ उच्च न्यायालयाची स्थगिती

‘अल्कोहल विथड्रॉवल सिंड्रोम’ (दारु पिणे थांबवल्यानंतर व्यक्तीत दिसणारी लक्षणे) या आजाराने पीडित असणार्‍यांना मद्य विकण्याच्या ठेवण्याच्या केरळ सरकारच्या निर्णयाला केरळ उच्च न्यायालयाने ३ आठवड्यांसाठी स्थगिती दिली.

 मुंबईत एका दिवसात आढळले ५७ रुग्ण , राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४१६

२ एप्रिलला सायंकाळपर्यंत राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४१६ पर्यंत पोचली.

कोरोना विषाणूशी लढण्यासाठी भारत सिद्ध करणार ‘हजमत सूट’ !

कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणार्‍या भारतातील डॉक्टरांसाठी संरक्षक कवच म्हणून ‘हजमत सूट’ (पोशाख) देशातच सिद्ध करण्यात येणार आहे. सध्या अनेक देशांत या पोशाखाचा वापर केला जातो. ‘इबोला’, ‘कोरोना’ यांसारख्या विषाणूंचे संक्रमण झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे आधुनिक वैद्य आणि…

देशात आतापर्यंत १ सहस्र ४० जणांना कोरोनाची लागण

देशभरात आतापर्यंत १ सहस्र ४० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय कोरोनामुळे आतापर्यंत एकूण २६ जणांचा मृत्यू झाला आहे.