मुंबईत एका दिवसात आढळले ५७ रुग्ण , राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४१६

मुंबई – २ एप्रिलला सायंकाळपर्यंत राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४१६ पर्यंत पोचली. यामध्ये मुंबईत दिवसभरात ५७ रुग्ण आढळले. यासह पुणे ६, पिंपरी-चिंचवड ३, नगर ९, ठाणे ५, यवतमाळ  ४  आणि बुलढाणा येथे १ अशा संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळले. सायंकाळी उशिरापर्यंत राज्यातील कोरोनामुळे मृत्यू पडलेल्या रुग्णांची संख्या १९ झाली आहे. मुंबईत २१३ ‘कंटेनमेंट झोन’ (प्रादुर्भाव झालेले क्षेत्र) घोषित करण्यात आले आहेत. जवळपास अर्धी मुंबई बंद करण्यात आली आहे.