कोरोनामुळे आता अधिवक्त्यांना काळा कोट घालणे बंधनकारक नाही ! – सर्वोच्च न्यायालयाचा काही कालावधीसाठी निर्णय

मुळात काळा कोट, झगा आणि टाय वापरणे ही इंग्रजांची गुलामगिरी आहे. ती भारतात आतापर्यंत टाकून देणे अपेक्षित होते, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

नवी देहली – कोरोनामुळे आता अधिवक्त्यांना आभासी सुनावणीच्या वेळी (व्हर्च्युअल कोर्ट सिस्टिमच्या वेळी) अंगात काळ्या रंगाचा कोट किंवा रोब (झगा) घालण्याचे बंधन नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अधिवक्ता युक्तीवादाच्या वेळी केवळ पांढरा शर्ट आणि नेक टाय वापरू शकतील. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची उपाययोजना म्हणून न्यायालयाने तात्पुरत्या स्वरूपात हा निर्णय घोषित केला. पुढील आदेश येईपर्यंत ही सवलत देण्यात आली आहे. वैद्यकीय सल्ल्याला अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे.