-
रुग्णवाहिकेची तोडफोड
-
पोलीस आणि डॉक्टर घायाळ
पोलीस आणखी किती दिवस धर्मांधांकडून असे मार खात रहाणार आहेत ? ‘देशात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या असतांना त्यातून काहीही न शिकणार्या पोलिसांना धर्मांधांकडून मार खाणे आवडते’, असे समजायचे का ?
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथील नवापुरामधील मशिदीजवळील भागात कोरोना संशयितांची पडताळणी करण्यासाठी गेलेले वैद्यकीय पथक आणि पोलीस यांच्यावर धर्मांधांनी आक्रमण केले. यात पोलीस आणि डॉक्टर घायाळ झाले. या वेळी धर्मांधांनी रुग्णवाहिकेची तोडफोड केली, तसेच पोलिसांच्या गाडीच्या काचा फोडल्या. पोलिसांनी वैद्यकीय पथकाला सोडून तेथून पलायन केले. (असे पळपुटे पोलीस काय कामाचे ? स्वतःचे रक्षण करू न शकणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ? – संपादक) त्यामुळे धर्मांधांनी एका डॉक्टरला पकडून ठेवले. या घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हाधिकारी अन् पोलीस अधीक्षक फौजफाट्यासह तेथे पोचले आणि १० जणांना कह्यात घेतले. या मशिदीच्या इमामाची चौकशी करण्यात येत आहे.
पोलिसांनी सांगितले की, आक्रमण करणार्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तोडफोड करणार्यांकडून हानीभरपाई करण्याचाही आदेश दिला आहे. काही दिवसांपूर्वी येथील रुग्णालयात सरताज नावाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. ‘तो ज्या भागात रहात होता, तेथील लोकांना याची लागण झाली आहे का ?’, याची पडताळणी करण्यासाठी वैद्यकीय पथक नवापुरा भागात गेले होते. त्या वेळी ही घटना घडली.
औरंगाबाद (बिहार) येथेही वैद्यकीय पथकावर आक्रमण
औरंगाबाद येथील एकौनी गावामध्येही वैद्यकीय उपचार करणार्या पथकावर गावकर्यांनी आक्रमण केले. त्यांनी डॉक्टर आणि कर्मचारी यांना मारहाण केली, तसेच त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे पथकातील सदस्यांना पलायन करावे लागले.