देशात आतापर्यंत १ सहस्र ४० जणांना कोरोनाची लागण

नवी देहली – देशभरात आतापर्यंत १ सहस्र ४० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय कोरोनामुळे आतापर्यंत एकूण २६ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ८५ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. देशात २९ मार्च या दिवशी कोरोनाची लागण झालेले १७९ नवे रुग्ण आढळले. एका दिवसामध्ये इतक्या संख्येने कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची ही पहिलीच वेळ आहे.