देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ सहस्र ९७२, मृतांची संख्या ७५

 

नवी देहली – देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ सहस्र ९७२, तर मृतांची संख्या ७५ झाली आहे. कोरोनामुळे संसर्ग झालेले १९२ जण बरे झाले आहेत. देशात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात (४२३) असून त्या खालोखाल तमिळनाडू (४११) आणि देहली (३८४) यांचा क्रमांक लागतो.

२४ घंट्यांत १२ जणांचा मृत्यू ! – आरोग्य मंत्रालय

देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या २४ घंट्यांत १२ जणांचा मृत्यू. ही संख्या एका दिवसातील सर्वाधिक आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये ५० वैद्यकीय कर्मचारी आहेत. यांत डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे.