हिंदुहृदयसम्राट !

‘काश्‍मिरी हिंदूंसाठी प्रत्‍यक्ष कृती करणारे शिवसेनाप्रमुख एकमेव नेते आहेत’, असे स्‍वतः काश्‍मिरी हिंदू सांगतात. यातून शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्‍व कसे होते ?, हे लक्षात येते. स्‍वातंत्र्यवीर सावरकरांच्या नंतर हिंदुत्‍वाच्‍या अंगाराची प्रखरता हिंदूंमध्‍ये निर्माण करणार्‍या हिंदुहृदयसम्राटाला अभिवादन !

हिंदु नेते असुरक्षित !

हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता, राष्‍ट्रपुरुष आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांच्‍याकडे वक्रदृष्‍टीने पहाण्‍याचे धाडस कुणी करणार नाही, अशी पत हिंदूंनी निर्माण करावी !

चालत्‍या शवपेट्या !

‘प्रत्‍येक वाहनाला सुरक्षेचे मानक असतात. असे मानक ‘स्‍लिपर कोच’ बसगाड्यांना आहेत कि नाहीत ?’, असा प्रश्‍न निर्माण होतो. एवढे अपघात होऊनही संबंधित सरकारांनी ते रोखण्‍यासाठी काहीही उपाय योजले नाहीत, हेच या अपघातांची वाढती संख्‍या दर्शवते.

संवेदनाशून्‍य देहली !

देहलीकरांची संकुचित वृत्ती ‘आपणही समाजाचा एक अविभाज्‍य घटक आहोत, उद्या ही वेळ स्‍वतःवरही येऊ शकते’, हे विसरला आहे !

शिक्षणक्षेत्रात जिहादचे विष पेरून हिंदूंची भावी पिढी धर्मांतरित करण्‍याचे घातक षड्‍यंत्र !

हिंदूंनो, आपली भावी पिढी हिंदु म्‍हणून रहाण्‍यासाठी आतापासूनच त्‍यांना धर्मशिक्षण द्या !

आस्‍तिकांची निरर्थक भीती !

जर नास्‍तिक जाहीर व्‍यासपिठावर, विविध वृत्तपत्रे, समाजमाध्‍यमे यांमधून स्‍वतःच्‍या नास्‍तिकतेचा डिंगोरा पिटतात, तर आस्‍तिकांनी स्‍वतःची आस्‍तिकता दाखवली, तर बिघडले काय ?

या पृथ्‍वीवर केवळ शूरच राज्‍य करू शकतात !

मी सत्‍य आणि न्‍याय यांच्‍या या लढाईत इस्रायलला पाठिंबा देऊ इच्‍छितो; कारण माझा असा विश्‍वास आहे की, हा लढा इस्रायलच्‍या द्रौपदीचे वस्‍त्रहरण करण्‍यापासून चालू झाला आणि त्‍याचे उत्तर प्रत्‍येक दुःशासनाची मांडी फोडणे, हेच आहे.

राज्‍यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांचा कारभार प्रशासकांच्‍या हाती !

स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमध्‍ये नगरसेवक हे नागरिकांचे प्रतिनिधीत्‍व करतात; मात्र नगरसेवकच नसल्‍याने नागरिकांनी त्‍यांचे प्रश्‍न आता मांडायचे कुणाकडे ? आणि ते सोडवायचे कसे ? हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अनेक प्रभागांमध्‍ये स्‍वच्‍छता, भटकी कुत्री, पाणी, जन्‍म-मृत्‍यूचे दाखले यांसह दैनंदिन समस्‍या आता सोडवण्‍यासाठी किंवा वाचा फोडण्‍यासाठी, आंदोलन करण्‍यासाठी कुणीच नसल्‍याने नागरिक हतबल आहेत !

‘डीपफेक’ प्रकरणात कायद्याचे साहाय्‍य !

‘डीपफेक’ चित्रफित ग्राहकांना हानी पोचवणार्‍या फसव्‍या हेतूने सिद्ध किंवा वितरित केले असल्‍यास प्रभावित व्‍यक्‍ती ग्राहक संरक्षण कायद्यांच्‍या अंतर्गत दिलासा मिळवू शकतात.

विनयभंग प्रकरणी मुंबई उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

उच्‍च न्‍यायालयाचे निकालपत्र अभिनंदनीय आणि स्‍वागतार्ह आहे. तसेच ज्‍या महिला रात्री-अपरात्री नोकरी व्‍यवसायाच्‍या निमित्ताने एकट्या प्रवास करतात, त्‍यांचे धाडस वाढवणारे आणि दिलासा देणारे निकालपत्र आहे.