
‘या पृथ्वीवर केवळ शूरच राज्य करू शकतात, भ्याडांना या पृथ्वीवर राज्य करण्याचा अधिकार नाही. सध्याच्या काळात मला एकच देश दिसतो, ज्यामध्ये एक शूर देश आहे, एक शूर वंश आणि एक शूर नेता आहे. हा तो देश आहे, जो संपूर्ण राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी, राष्ट्राच्या सन्मानासाठी आणि केवळ २०० ओलिसांना वाचवण्यासाठी जिवाची पर्वा न करता प्राणघातक राक्षसांचा समूळ उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध आहे.
भारतातील विरोधी पक्षातील काही नेते आपल्या सैन्यातील शूर सैनिकांना वेतनभोगी समजतात आणि वेतनाच्या बदल्यात प्राणांची आहुती देणे, हा त्यांचा व्यवसाय समजतात. या सूरदासांना आपण शूर, शूरांचा आदर करणारे, राष्ट्राचे रक्षक समजू शकतो का ? नाही ! राष्ट्र हे संख्येने बनलेले नाही. राष्ट्र रानटी आतंकवादी आणि स्वार्थी तत्त्व यांनी बनत नसते. मी सत्य आणि न्याय यांच्या या लढाईत इस्रायलला पाठिंबा देऊ इच्छितो; कारण माझा असा विश्वास आहे की, हा लढा इस्रायलच्या द्रौपदीचे वस्त्रहरण करण्यापासून चालू झाला आणि त्याचे उत्तर प्रत्येक दुःशासनाची मांडी फोडणे, हेच आहे. मी त्या भूमीला वंदन करतो, जेथे वीर आहेत. त्यांनी आपल्या माता, भगिनी आणि राष्ट्र यांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी स्वतःचे प्राण पणाला लावले. शेवटी या विरांचाच विजय होईल. मी या विरांना वंदन करतो. हे महान युद्ध सत्यासाठी लढले जात आहे. नेहमीच सत्याचा विजय होतो आणि आताही होईल.
– डॉ. अजय सिंह, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, वर्ल्ड हिंदू फेडरेशन
‘गूगल मॅप’ आणि ज्योतिषशास्त्र
कुत्र्याला श्रीकृष्णाच्या रूपात दाखवणार्या महिलेला जामीन देतांना हिंदूंच्या भावनांचा अनादर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निवाडा !
वारकरी संप्रदायाची वेशभूषा
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
तुका आकाशाएवढा…
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?