आंध्रप्रदेशच्या एलुरू जिल्ह्यामध्ये अज्ञात आजारामुळे एकाचा मृत्यू, तर २९२ जण आजारी

संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाशी सामना करत असतांना आंध्रप्रदेशच्या एलुरू जिल्ह्यामध्ये एका अज्ञात आजारामुळे एकाचा मृत्यू झाला आहे, तर २९२ हून अधिक लोक आजारी पडले आहेत.

सिंधुदुर्गातील कोरोनाविषयीची सद्य:स्थिती

दळणवळण बंदीमध्ये शिथिलता आली, याचा अर्थ कोरोनाचे संकट टळले असे नाही, हे जिल्ह्यात वाढणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवरून लक्षात येते. जनतेने कोरोनाविषयीच्या शासकीय आणि वैद्यकीय नियमांचे पालन करणेच योग्य !

१२ लाख रुपयांची अवैध मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

सातत्याने गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्रात अवैध मद्याची वाहतूक होत असल्याच्या घटना उघड होत आहेत. पोलिसांनी कारवाई केली, तरीही हे प्रकार चालूच आहेत.

पाकमध्ये मुसलमान तरुणाचा विवाहाचा प्रस्ताव नाकारणार्‍या ख्रिस्ती तरुणीची हत्या

याविषयी भारतातील तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि पाकप्रेमी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !

राज्यातील ‘जलक्रीडा’ चालू करण्याविषयी लवकरच आदर्श कार्यप्रणाली ! – अस्लम शेख, मत्स्यव्यवसाय मंत्री, महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये पर्यटन व्यवसायाला अनुकूल वातावरण आहे. रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता या क्षेत्रामध्ये आहे.

आसाममधील ‘एआययूडीएफ’च्या ‘अजमल फाऊंडेशन’ला विदेशी जिहादी संघटनांकडून मिळाल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्या ! – ‘लीगल राइट्स ऑब्जर्वेटरी’चा दावा

‘लीगल राइट्स ऑब्जर्वेटरी’ या संस्थेला अशी माहिती मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या केंद्र सरकारला का मिळत नाही ? असा प्रश्‍न उपस्थित होतो !

हे शेतकर्‍यांचे आंदोलन नसून धनदांडग्या दलालांचे आंदोलन ! – नितीन फळदेसाई, प्रदेशाध्यक्ष, गोवा सुरक्षा मंच

शेतकर्‍यांच्या नावाखाली पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला गोवा सुरक्षा मंचचा विरोध

मोरजीतील काँग्रेस उमेदवाराचा मगोच्या उमेदवाराला पाठिंबा

राज्यात १२ डिसेंबरला होणार्‍या जिल्हा पंचायत निवडणुकीत मोरजीतील काँग्रेसचे उमेदवार महेश कोंडारकर यांनी मगोपचे उमेदवार श्रीधर मांजरेकर यांना पाठिंबा घोषित केला आहे.

बंदुकीची गोळी लागून युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी चौघांना पोलीस कोठडी

युवराज दीपक वारंग (वय १८ वर्षे) या युवकाचा २६ नोव्हेंबरला छातीत बंदुकीची गोळी (छरा) घुसून मृत्यू झाला होता. या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी ४  संशयितांना अटक केली अन् त्यांच्याकडून २ बंदूका कह्यात घेतल्या.

तम्नार वीज प्रकल्पाला मोले ग्रामपंचायतीने दिलेली बांधकाम अनुज्ञप्ती न्यायालयाकडून रहित

सांगोड येथे उभारण्यात येणार्‍या तम्नार वीजप्रकल्पाला मोले पंचायतीने दिलेली बांधकाम अनुज्ञप्ती उच्च न्यायालयाने रहित केली आहे.