चिनी सैन्य अद्यापही भारतासमवेतच्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील मोक्याच्या ठिकाणावर कायम ! – अमेरिकेचे सैन्य कमांडर अ‍ॅडमिरल फिलिप डेव्हिडसन

दोन्ही देशांनी सैन्य मागे घेणे चालू केलेले असतांना अमेरिकेकडून अशी माहिती मिळते. याचा अर्थ भारतीय जनतेपासून खरी माहिती लपवून ठेवली जात आहे ! भारतीय सैन्याने किंवा संरक्षण मंत्रालयाने याविषयी जनतेला योग्य माहिती दिली पाहिजे !

विरोधकांनी तपासाला दिशा देण्याचे काम करू नये ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

सचिन वाझे काही वर्षांपूर्वी शिवसेनेत होते; मात्र त्यांनी सदस्यत्वाचे नूतनीकरण केले नाही. सध्या त्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. सचिन वाझे हा ओसामा बिन लादेन असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे.

अंबानींना ‘हेलिपॅड’ची अनुमती मिळण्यासाठी भाजपनेच स्फोटकांच्या वाहनाचे प्रकरण घडवून आणले  ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

महत्त्वाच्या सूत्रावर चर्चा होऊ नये, यासाठी भाजपनेच या सूत्रावर गोंधळ घालून अधिवेशनाचा वेळ वाया घालवला आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री

तीरथ सिंह रावत यांनी १० मार्च या दिवशी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्री पदावरून भाजपकडून हटवण्यात आल्यानंतर तीरथ रावत यांची सकाळी विधीमंडळ सदस्यांकडून निवड करण्यात आल्यावर सायंकाळी त्यांचा शपथविधी करण्यात आला.

पाकव्याप्त काश्मीरवर पाकचे अवैध नियंत्रण !

युनायटेड कश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीचे निर्वासित अध्यक्ष शौकत अली काश्मिरी यांनी पाकला फटकारले !

मेगन मर्केल यांच्या आरोपांवर कुटुंब खासगीत चर्चा करील ! – ब्रिटीश राजघराणे 

ब्रिटीश राजघराण्याची धाकटी सून मेगन मार्केल हिने एका मुलाखतीमध्ये राजघराण्याविषयी केलेल्या गौप्यस्फोटानंतर त्याला ब्रिटनची राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी उत्तर दिले असून प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांच्याविषयी चिंता आणि सहानुभूती व्यक्त करत ‘कुटुंब खासगीत यासंबंधी चर्चा करील’ असे म्हटले आहे.

अमेरिकेने तुर्कस्तानकडून पाकला देण्यात येणार्‍या ३० लढाऊ विमानांची विक्री रोखली !

तुर्कस्तानमध्ये बनलेली ३० लढाऊ हेलिकॉप्टर्स पाकला विकण्यास अमेरिकेने रोखले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये अमेरिकेचे इंजिन असते. त्यामुळे ही विमाने विकण्यापूर्वी अमेरिकेची अनुमती घ्यावी लागते. तुर्कस्तानच्या राष्ट्रपतींचे प्रवक्ते इब्राहिम कालिन यांनी याविषयी माहिती दिली.

महाराष्ट्राच्या इतिहासात ठाकरे सरकार हे लबाड सरकार अशी नोंद होईल !

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडे महत्त्वाची माहिती असल्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न !

‘आयएन्एस् करंज’ ही पानबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल

‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखली जाणारी ‘आयएन्एस् करंज’ ही अत्याधुनिक पाणबुडी १० मार्च या दिवशी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. मुंबई येथील पश्‍चिम कमांड नौदलाच्या मुख्यालयामध्ये नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमवीर सिंग यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडून साधूसंतांना लसीकरण करण्याची सरकारकडे मागणी !

कोरोनाचा संसर्ग न होण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्याचा कार्यक्रम चालू करण्यात आला आहे. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून आधारकार्ड आणि शिधापत्रिका घेण्यात येत आहेत