ताळगाव पंचायतीचा पणजी महानगरपालिकेत समावेश करणार नाही ! – जेनिफर मोन्सेरात, माहिती तंत्रज्ञान मंत्री

ताळगाव पंचायतीचा पणजी महानगरपालिकेत समावेश करण्यात येणार नाही, अशी माहिती ताळगावच्या आमदार तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी दिली. मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.

एकाच व्यक्तीने दोनदा विवाहनोंदणी केल्याप्रकरणी चौकशी करण्याची महिला काँग्रेसची मागणी

या प्रकरणी विवाहनोंदणी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी लाच घेऊन विवाह प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी केला आहे.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने आयोजित सामूहिक नामजप कार्यक्रमाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सामूहिक नामजपामुळे भक्तीभाव वृद्धींगत होणे, मन एकाग्र होणे, चैतन्य अनुभवता येणे आदी अनुभूती आल्याचे उपस्थितांनी सांगितले. १५० जिज्ञासूंनी लाभ घेतला.

करवीर तालुका महिला आघाडी आणि करवीर शिवसेना यांच्या वतीने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन ! 

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने करवीर तालुका महिला आघाडीच्या सौ. स्वाती यादव म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाला घडवणार्‍या राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेऊन प्रत्येक मातेने स्वत:च्या मुलाला राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध करावे आणि मुलावर संस्कार करावे. 

वणीत धर्मांध क्रिकेट बुकींना अटक

क्रिकेटच्या सट्ट्यातही धर्मांधांचा सहभाग !
जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ यांच्या आदेशाने विशेष पथकाने आमेर हॉटेलमधून ४ धर्मांधांसमवेत ६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रेल्वेच्या अवैध तिकीटविक्री प्रकरणी तीन दलालांना अटक

मुंबईमध्ये मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटांची अनधिकृत विक्री करणार्‍या तीन दलालांना अटक करून त्यांच्याकडून ४०० ई-तिकिटे हस्तगत करण्यात आली आहेत. हस्तगत केलेल्या तिकिटांचे एकूण मूल्य ६ लाख रुपयांहून अधिक आहे.

नियम-अटी यांचे पालन करून शिवजयंती साजरी करू !

शिवजयंती उत्साहातच झाली पाहिजे ! – रविकिरण इंगवले, शिवसेना

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची बैठकीत चर्चा नाही

धनंजय मुंडे यांच्यावर होणारे आरोप गंभीर आहेत याविषयी चर्चा होत आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या टि्वटर हॅण्डलवर ‘धाराशिव-उस्मानाबाद’ असा उल्लेख

शिवसेना शहरांच्या नामांतरणाच्या विषयी सकारात्मक असल्याचे दिसून येते आहे.

पिंपरी शहरात दहशत पसरवणार्‍या दोन टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई

निगडीमधील अमोल वाले टोळी आणि पिंपरीतील धर्मेश पाटील टोळी यांच्यावर मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली