पाश्‍चात्त्यांच्या ‘डेज’ऐवजी हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्याचा सहभागी युवकांचा संकल्प !

योग वेदांत सेवा समितीच्या वतीने ‘मातृ-पितृ पूजनदिन’ मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि यवतमाळ जिल्ह्यांत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

हिंदु जनजागृती समितीचे वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे पोलीस, प्रशासन अन् शिक्षणाधिकारी यांना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात निवेदन  !

१४ फेब्रुवारी या दिवशी ‘मातृ-पितृ पूजनदिना’ला शासनाने प्रोत्साहन द्यावे, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा, हिंगणघाट, चंद्रपूर, गडचिरोली येथे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले.

वस्तू आणि सेवाकराची बनावट देयके सादर केल्याप्रकरणी पुण्यातील व्यापार्‍यास अटक !

बनावट देयके करणार्‍यांना कठोर शिक्षा त्वरित झाल्यासच अशा घटना पुन्हा घडणार नाहीत.

पुण्यात ५ वर्षांच्या मुलीवर हॉटेलच्या सुरक्षारक्षकाकडून अत्याचार !

समाजाची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हे या घटनेतून लक्षात येते. समाजाची दु:स्थिती दूर करण्यासाठी धर्मशिक्षण देणे, तसेच कायद्याचा धाक निर्माण करणे आवश्यक आहे !

दिशा रवि, निकिता जेकब आणि शांतनु यांनी ‘टूलकिट’ बनवले आणि ‘शेअर’ केले ! – देहली पोलीस

पोलिसांनी सांगितले टूलकिट प्रकरणात खलिस्तावादी ‘पोएटीक जस्टिस फाउंडेशन’चाही सहभाग आहे.

मुंबई महापालिकेने विकासकामांचा निधी का वळवला याविषयी चर्चा !

मुंबईतील नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात विकासकामे करण्यासाठी निधीची कमतरता भासू लागली आहे. हा निधी कोरोनासाठीच्या उपाययोजनांवर व्यय करण्यात आला असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे.

चेंबूर (मुंबई) येथे कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ, प्रभागात पुन्हा दळणवळण बंदी लागू !

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे चेंबूरमधील ‘एम् पश्‍चिम’ प्रभागात मागील आठवड्यात दिवसाला सरासरी १५ कोरोनाबाधित रुग्ण सापडत होते; मात्र या आठवड्यात ही संख्या २५ पर्यंत पोचली आहे.

आफ्रिकेमधील गिनी देशामध्ये ५ वर्षांनंतर इबोला विषाणूमुळे ४ जणांचा मृत्यू

इबोलाचा वाढता धोका पाहता गिनी देशातील सरकारने या संसर्गाला महामारी घोषित केले आहे. इबोला विषाणूचा संसर्ग झाल्याने आतापर्यंत पश्‍चिम आफ्रिकेमध्ये ११ सहस्र ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ

आठवडाभरापासून पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत  आहे. बाजारपेठा, कार्यालये, उपाहारगृह आणि अन्य खासगी कार्यक्रमांना गर्दी, लोकांचा निष्काळजीपणा यांमुळे कोरोनाचा फैलाव होत आहे. दहा दिवसांपूर्वी ४ ते ५ टक्के असलेला संसर्ग वाढीचा दर गेल्या आठवड्यात १० टक्क्यांपर्यंत पोचला आहे

बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक यांचे ६ मासांत खासगीकरण होणार !

सरकार मंदिरांचे सरकारीकरण करते, तर सरकारी बँकांचे खासगीकरण करते, हे लक्षात घ्या आणि मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्यास सरकारला भाग पाडा !