बीड येथे एकाच चितेवर कोरोनाने मृत्यू झालेल्या ८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

बीड – जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ८ जणांवर एकाच चितेवर अंत्यविधी करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्याकडून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. नगरपालिकेच्या पथकाने एकाच रुग्णवाहिकेतून हे आठही मृतदेह स्मशानभूमीत आणले. या वेळी मृतांच्या २ कुटुंबियांना पीपीई किट घालून उपस्थित रहाण्याची अनुमती देण्यात आली होती. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून अन्य रुग्ण ६० वर्षांपुढील होते.