कोरोनावरील लस उपलब्ध न झाल्यास महाराष्ट्रातील लसीकरण बंद पडेल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

केंद्रशासनाकडे प्रती आठवड्याला कोरोनावरील ४० लाख लसीचे डोस मागण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत महाराष्ट्रात कोरोनावरील लसीचे १४ लाख डोस शिल्लक आहेत. हा साठा ३ दिवस पुरेल इतका आहे. केंद्रशासनाकडून वेळेत डोस पुरवले गेले नाहीत, तर महाराष्ट्रातील लसीकरण बंद पडू शकते

अमळनेर (जिल्हा जळगाव) येथील ‘मंगळग्रह सेवा संस्थे’कडून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रांताधिकार्‍यांना १ लाख रुपयांचा धनादेश !

जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था ही केवळ एक धार्मिक संस्था नसून सामाजिक जाणिवेचे भान ठेवणारी संस्था आहे.

राहुरी (नगर) येथील पत्रकार आणि माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची अपहरणानंतर हत्या

राहुरी (नगर) येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार आणि माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी हस्तगत केले असून आरोपी राज्यातील एका सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे.

धर्मनिरपेक्ष लोकशाहीची थट्टा !

बंगालच्या राजकीय रणधुमाळीने किती खालचा स्तर गाठला आहे. ही लोकशाहीची थट्टाच असून जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करून नव्हे, तर धर्माधारित मते मागून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न होणे, हे पूर्णत: निषेधार्हच आहे.

कुर्ला (मुंबई) येथे गुलाब इस्टेटमध्ये भीषण आग

कुर्ला येथील गुलाब इस्टेटमध्ये स्पेअर पार्ट्सच्या गोदामांना भीषण आग लागली. आगीचे कारण कळू शकले नाही.

(म्हणे) ‘पाकमधील बलात्कारांसाठी भारतीय संस्कृती उत्तरदायी !’ – पाकच्या पंतप्रधानांचे भारतद्वेषी विधान 

भारतीय संस्कृतीचे आचरण पाकच्या नागरिकांनी केले असते, तर तेथे बलात्कार झाले नसते आणि जिहादी आतंकवादीही निर्माण झाले नसते ! 

अत्यावश्यक रुग्णसेवेसाठी शिवसेनेशी संपर्क साधावा ! – राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

कोरोना लढ्यासाठी शिवसेनेची ‘माझे शहर-माझी जबाबदारी’ हेल्पलाईन मोहीम

पुणे महानगर परिवहन मंडळाची सेवा सामान्यांसाठी बंद ठेवल्यामुळे नागरिकांचे हाल !

राज्य सरकारने नव्याने जाहीर केलेल्या नियमानुसार सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत बाजारपेठा आणि विविध आस्थापनांना चालू ठेवण्यास अनुमती दिली आहे. तसेच दिवसा जमावबंदी आणि रात्रीला संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला.

रोडिज स्पर्धक आणि मॉडेल साकिब खान यानेे इस्लाम धर्मासाठी मनोरंजनसृष्टी सोडली !

इस्लाम धर्म, अल्लाह आणि कुराण यांच्यासाठी मनोरंजन विश्‍वातून बाहेर पडणार्‍या अभिनेत्याकडून हिंदु धर्मीय बोध घेतील का ?

खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्याकडून नगर येथील वाळू तस्करीसंबंधीचे पुरावे एकत्र

कारवाई न झाल्यास उपोषण करण्याची चेतावणी