कुर्ला (मुंबई) येथे गुलाब इस्टेटमध्ये भीषण आग

कुर्ला येथील गोदामांना लागलेली भीषण आग

कुर्ला – येथील गुलाब इस्टेटमध्ये स्पेअर पार्ट्सच्या गोदामांना ७ एप्रिल या दिवशी भीषण आग लागली. हा परिसर चिंचोळ्या गल्ल्यांचा असल्यामुळे अग्निशमन दलाच्या ४ गाड्यांना तेथे पोचण्यात अडचणी आल्या. आगीचे कारण कळू शकले नाही. आगीत जीवितहानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.