(म्हणे) ‘हिंदु कायद्यान्वये समलैंगिक विवाहाला मान्यता द्या !’

हिंदु विवाह कायदा हा भारतीय राज्यघटनेने बनवला असला, तरी हिंदु धर्मशास्त्रानुसार अशा प्रकारच्या विवाहाला संमती नाही. त्यामुळे याचा न्यायालयाने विरोधच केला पाहिजे, असे धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !

श्रीलंकेमध्ये लिट्टेच्या मृत कार्यकर्त्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम करण्यावर न्यायालयाकडून बंदी  

श्रीलंकेतील २ न्यायालयांनी लिट्टेच्या कार्यकर्त्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यास बंदी घातली आहे. हे दोघे कार्यकर्ते श्रीलंकेच्या सैन्यासमवेत झालेल्या युद्धामध्ये ठार झाले होते.

उत्तरप्रदेश सरकारकडून ‘लव्ह जिहाद’विरोधातील कायद्यासाठी विधी विभागाकडे प्रस्ताव सादर

उत्तरप्रदेश राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात असा कायदा करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकाला पाक सीमेवर तस्करी केल्याच्या प्रकरणी अटक

पंजाब पोलिसांनी सीमा सुरक्षा दलाच्या रवींद्र सिंह या सैनिकाला पाकसाठी शस्त्र आणि अमली पदार्थ यांची तस्करी केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे.

नरकासुराच्या प्रतिमा बनवण्यावर गोव्यात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी !

देणगीचे हे पैसे शिक्षण, युवकांना रोजगार, सामूहिक कृषी लागवड, आरोग्य रक्षण, क्रीडा सुविधांमध्ये सुधारणा आदींवर खर्च केल्यास योग्य झाले असते. या देणगीचा शेवटी प्रतिमादहन करून धूरच होत असतो. मुलांना योग्य ते देण्याची आता वेळ आली आहे.

तीन दिवसांत वीजदेयक सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात आंदोलन करणार ! – अतुल भातखळकर, भाजप

महाविकास आघाडी सरकारने येत्या तीन दिवसांत वीजदेयकांच्या सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू, अशी चेतावणी भाजपचे मुंबई प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिली आहे.

नामवंत सराफ व्यावसायिक किशोर पंडित यांचे निधन

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संचालक, सांगली जिल्हा सराफ समितीचे मार्गदर्शक, पंडित ज्वेलर्सचे किशोर पंडित यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने २० नोव्हेंबर या दिवशी निधन झाले.

खानापुरातील एका चौकाचे ‘टिपू सुलतान चौक’ असे केलेले नामकरण पालटा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे बांधकाम खात्याला निवेदन

खानापूर शहरातील एका चौकाचे ‘टिपू सुलतान चौक’ असे नामकरण करण्यात आले आहे. या नामकरणाला भाजप, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी विरोध केला आहे. कर्नाटक सरकारने टिपू सुलतानची जयंती बंद केली असून त्याच्याशी संबंधित इतिहास अभ्यासक्रमातून काढून टाकला आहे.

महाविकास आघाडी सरकारने जनतेची पूर्णतः फसवणूक केली ! – आमदार सुधीर गाडगीळ

राज्य सरकारने कोरोनाच्या काळात वीजदेयक माफ करण्याचे आश्‍वासन दिले होते; परंतु सरकारने पैसे नाहीत, हे कारण सांगत त्यांचा शब्द फिरवला आहे.