मारुति चौक येथे भाजपच्या वतीने वीजदेयक फाडून निदर्शने

सांगली, २० नोव्हेंबर (वार्ता.) – राज्य सरकारने कोरोनाच्या काळात वीजदेयक माफ करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु सरकारने पैसे नाहीत, हे कारण सांगत त्यांचा शब्द फिरवला आहे. आता आघाडी सरकार त्यांचा शब्द फिरवून ‘आम्ही असे बोललोच नाही’, असे सांगून केंद्र सरकारने आम्हाला पैसे द्यावेत, अशी मागणी करत आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेची पूर्णतः फसवणूक केली असून ऊर्जामंत्र्यांनी दिलेला शब्द फिरवल्याने त्यागपत्र द्यावे, अशी मागणी भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी केली. मारुति चौक येथे भाजपच्या वतीने २० नोव्हेंबर या दिवशी वीजदेयके फाडून निदर्शने करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी शहर जिल्हाध्यक्ष श्री. दीपकबाबा शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. स्वाती शिंदे, नगरसेवक श्री. युवराज बावडेकर, श्री. लक्ष्मण नवलाई, सर्वश्री प्रकाश बिरजे, पृथ्वीराज पवार, गौतम पवार, श्रीकांत शिंदे, प्रसिद्धीप्रमुख श्री. केदार खाडिलकर यांसह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !