अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ?
खानापूर (कर्नाटक) – खानापूर शहरातील एका चौकाचे ‘टिपू सुलतान चौक’ असे नामकरण करण्यात आले आहे. या नामकरणाला भाजप, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी विरोध केला आहे. कर्नाटक सरकारने टिपू सुलतानची जयंती बंद केली असून त्याच्याशी संबंधित इतिहास अभ्यासक्रमातून काढून टाकला आहे. तरी हे नामकरण तातडीने रहित करून त्या चौकाचे नाव ‘माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम चौक’, असे करावे या मागणीसाठी भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली १९ नोव्हेंबर या दिवशी भाजप, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांनी बांधकाम खात्यावर मोर्चा काढून निवेदन दिले. (लाखो हिंदूंचे धर्मांतर करणार्या क्रूरकर्मा टिपू सुलतानने दक्षिण भारतातील ८ सहस्रांपेक्षा अधिक हिंदूंची मंदिरे पाडली. टिपूच्या अत्याचारी राजवटीत हिंदु तरुण मुलींचा अमानुष छळ करून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. अशा अत्याचारी टिपूचे नाव चौकाला कशासाठी ? भाजप शासनाने यात लक्ष घालून तातडीने नाव कसे पालटले जाईल असे पहावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक)