नामवंत सराफ व्यावसायिक किशोर पंडित यांचे निधन

किशोर पंडित

सांगली, २० नोव्हेंबर (वार्ता.) – डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संचालक, सांगली जिल्हा सराफ समितीचे मार्गदर्शक, पंडित ज्वेलर्सचे किशोर पंडित यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने २० नोव्हेंबर या दिवशी निधन झाले. किशोर पंडित हे अभाविप, टिळक स्मारक मंदिर आणि विविध सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांत नेहमी अग्रेसर होते.